Saturday, January 14, 2006

महाराष्ट्राला वाचवा?

काही महीने आधी एका मित्राने मला एक भलताच सटकलेला blog दाखविला. महाराष्ट्राला वाचवा असा नारा घेऊन सुरू केलेला हा blog जरा जास्तीच जहाळ विचार व्यक्त करीत होता. मद्रासी, भैय्या, मारवाडी, गुजराती..... अक्शरश: प्रत्येक समुदायाबद्दल ह्या blog वर गरळ ओकलेली आढळते. द्वेष, राग आणि शिवीगाळ करून जर महाराष्ट्र वाचणार असेल तर हा ब्लोग नक्कीच सफ़ल होईल. मी त्या blog कडे नन्तर फ़ारसे लक्श्य दिले नाही आणि Vantage Point वर उल्लेख देखील केला नाही. त्या ब्लोग वरचे विचार एखाद्या शिवसैनिकाला सुद्धा लाजवितील असे मी काही लोकान्ना सांगितले.

Desipunditकर्वी एक असा blog पाहिला ज्याने त्या blog वरच्या विचारांना अगदी बरोबर उत्तर दिले आहे. योगायोग असा की हा blog चक्क एका शिवसैनिकाचा आहे. त्याने आपले विचार खूप समजुतदारपणे मांडलेले आहेत. जरूर वाचा आणि त्या blog वर किन्वा Desipunditवर चर्चेत सहभागी व्हा.

Friday, January 13, 2006

मोहम्मद यूसुफ़ असशील घरचा!

मोहम्मद यूसुफ़? हे नाव मी पहिल्यान्दा ऐकले एखाद-दोन महीने आधी. पाकिस्तान-इन्ग्लन्ड टेस्ट सुरू होती आणि विश्लेषक सारखे "मोहम्मद यूसुफ़ मोहम्मद यूसुफ़" म्हणत होते. टीवीवर पहातो तर इन्झमाम आणि योहाना batting करत होते. मग हा मोहम्मद यूसुफ़ कोण हे मला काही कळेना. नन्तर लक्शात आले - मोहम्मद यूसुफ़ हे योहानाचे नवीन नाव. मूळच्या ख्रिस्ती योहानाने इस्लाम धर्म स्वीकारल्याचे वाचले होते. पण त्याने नाव पण बदलले हे नव्हत माहित.

आज भारत-पाकिस्तान टेस्ट सुरु झाली. परत तो आला. पण मी काही त्याचा "मोहम्मद यूसुफ़" म्हणून विचार करणार नाही. मी त्याला योहानाच म्हणणार!

आणि त्याने हरकत घेतल्यास एखाद्या लहान मुलाप्रमाणे त्याला म्हणेन - "मोहम्मद यूसुफ़ असशील घरचा!"

Wednesday, January 11, 2006

टिपिकल मराठी लूक

"टिपिकल मराठी लूक" ची नक्की व्याख्या काय? मुम्बईत आल्यापासून मला बर्याच लोकान्नी असे सान्गितले आहे कि मी मराठी दिसत नाही. मराठी दिसणे म्हणजे नक्की काय हे मला कुणीही सान्गू शकलेले नाही. "टिपिकल कोकणस्थ लूक" सर्वान्ना माहिती आहे - cliched घारे गोरे. Exhibit A - अजीत आगरकर. आपण बाकी मराठी लोक बिचारे स्वता:च्या "लूक" बद्दल भलतेच confused आहोत.

तर चला चर्चा करूयात. "टिपिकल मराठी लूक" म्हणजे नक्की काय?

Tuesday, January 10, 2006

बरीच वर्ष टाळम्टाळ करून शेवटी मराठीमध्ये काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. पाहुयात किती जमतय ते. माझे नेहमीच असे म्हणणे असते की जरी एखादी व्यक्ति इन्ग्रजी माध्यमात शिकली असली तरी त्या व्यक्तीस आपल्या मात्रुभाषेत लिहिता-वाचता येणे काही अवघड नाही. त्यामुळे दर थोड्या दिवसान्नी एक 'पोश्ट' लिहीण्यास फ़ार त्रास होणार नाही अशी आशा आहे.

आता थोडे नावाबद्दल.

भुर्जी! भुर्जी का?, अस एखादा (कि'वा एखादी) विचारू शकेल.

तर तात्विक पातळीवर जाऊन विचार केल्यास हे नाव एखाद्या मनुश्याच्या निरागसतेचा हा समाज कसा चोथा करतो ह्याचे प्रतीक समजले जाऊ शकते. आर्थिक पातळीवर जाऊन विचार केल्यास हे नाव नैसर्गिक सम्पत्तिचे मनुष्य कसे वाट्टोळे करून टाकतो ह्याची खूण समजले जाऊ शकते. राजनैतिक पातळीवरून विचार करता हे नाव स्वदेशिचा नारा समजले जाऊ शकते.

पण वाचकहो! असल्या कुठल्याही पातळीवर उडी न घेता खर-खुर सान्गायच तर हे नाव माझ्या भुर्जी-प्रेमी पोटाचे व जिभेचे एक कुटील कारस्थान आहे!

तर मी काय म्हणतो..........