माझा पहिला सत्याग्रह
भुर्जीवर लिहून एक वर्ष झाले. ह्या लाम्बलचक व्यत्ययाचे कारण एकच - शुद्ध आळस. दुसरे काहीही नाही. इन्ग्रजीमध्ये मजकूर टाईप करणे, मग त्याचे देवनागरीकरण करणे आणी मग पोस्ट करणे..... कशाला नसती उठाठेव?
पण काल माझ्या इन्ग्रजी ब्लॉगच्या एका पोस्टवर एक प्रतिक्रिया मिळाली जिच्यामुळे बालफणीचा एक "किस्सा" आठविला. तो किस्सा मी इन्ग्रजी ब्लॉगवर पोस्ट केला आहे पण त्यास पूर्ण न्याय फ़क्त मराठीतच मिळू शकेल. तर लोकहो! सन्त तुकारामान्च्या शब्दात म्हणायच तर...... आय ऍम बॅक.
किस्सा साधारण १९९० सालचा आहे. मी माझ्या आजीबरोबर तिच्या भजनीमंडळाच्या जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. एका कोणत्यातरी आजींच्या घरी भरपूर आज्या आणी त्यांची ढीगभर नातवंडे. त्यातला एक नातू मी. वय वर्षे दहा. सर्व आज्या स्वयंपाकघरात पाकक्रीडेत व वाचाळक्रीडेत व्यस्त तर आम्ही पोरं-सोरं खेळक्रीडेत व्यस्त. आज्यांचा बहुतेक स्वयम्पाकपेक्शा गप्पांवर अधिक जोर असल्यामुळे एक वाजेपर्यन्त देखील भाज्या, आमटी, मसालेभात, कोशिम्बीर... वगैरे पदार्थ तयार होण्यास बराच वेळ होता. तयार होते ते फ़क्त पुर्यान्चे पीठ आणी श्रीखंड.
आम्ही पोरं "भूक लागली" चा कांगावा करायला लागलो. ह्या कांगाव्याला शांत करण्यासाठी आज्यांने एक "पॉलिसी डिसीझन" घेतले - पोरांची पंगत बसवून त्यांना श्रीखंड-पुरी वाढणे. पोरं खुष. आज्या खुष. पण केन्द्रीय सरकारच्या "पॉलिसी डिसीझन" प्रमाणे हा निर्णय देखील सर्व आशिलान्च्या गरजा लक्षात न घेता घेतला गेला होता.
आम्ही पोरं बसलो. ताटे मांडली गेली. आणी दोन आज्या श्रीखंड व पुरी घेऊन आल्या. दोन्ही पदार्थ वाढली गेली. आणी सर्व पोरं त्यांचा फ़डशा पडण्यात व्यस्त झाली.
सर्व पोरं? नव्हे! मी मात्र कशालाही हात न लावता स्वयंपाकघराच्या दाराकडे पाहात बसलो. दहा मिनिटांने त्या दोन आज्या दुसरी वाढ देण्यासाठी आल्या. पहातो तर काय? पुन्हा फ़क्त श्रीखंड पुरी? हे सर्व आनंदाने खाणार्या मुलांमध्ये मी म्हणजे एखाद्या मुहर्रमच्या ताजियामध्ये अडकलेल्या शिवसैनिकासारखा त्रस्त दिसत होतो. एका आजीचे माझ्याकडे लक्श गेले व तिने मला विचारले -
"बाळ, तू जेवत का नाही? पटापटा जेव पहू. शहाणा नातू ना तू? बघ श्रीखंड किती छान आहे."
मी आधी त्या श्रीखंडाकडे एक कुत्सित कटाक्श टाकला. मग त्या आजीकडे एक कुत्सित कटाक्श टाकला.
"मला श्रीखंड आवडत नाही. मला खरं जेवण पाहिजे."
"खरं जेवण म्हणजे?" आजींने विचारले.
"खरं म्हणजे काहीतरी खारं. भाजी, आमटी, भात वगैरे काहीतरी"
"तुला श्रीखंड पुरी आवडत नाही?" आजी "पी एस पी ओ नही जानता?" च्या चालीत उद्गारल्या. मी नकारार्थी मान डोलावली. त्या भल्या म्हातारीने स्वयंपाकघराकडे तोंड करून आरोळी दिली -
"सबनीसबाईंच्या नातवाला श्रीखंड नाही आवडत. त्याला काय द्यायचे जेवायला?"
पुढच्या दोन मिनिटात आक्खा आजीगण माझ्या समोर उभा होत. पेशवे पार्कातल्या एखाद्या नवीन अजब प्राण्याकडे पहावे तसे पाहून मला प्रत्येक आजी विचारत होती "खरंच नाही आवडत?"
ह्या आज्यांच्या घोलक्यातून माझ्या जन्मदात्याची जन्मदात्री पुढे आली व तिच्या कणखर आवाजात म्हणाली,
"गौरव! गपचुप वाढलय ते खा पाहू. कशाला तमाशा करतोयेस?"
"पण आजी, तुला माहिती आहे मला हे आवडत नाही. आपल्या घरी तरी कुठे खातो मी श्रीखंड?"
तेवढ्यात एका घार्या-गोर्या म्हातारीने आपला घारे-गोरेपणा सिद्ध करीत म्हटलं -
"अरे पण हे श्रीखंड काही तुझ्या आजीने नाही बनविले. पहा खाऊन. चांगले आहे."
हा शेरा ऐकून माझ्या आजीचा पारा अजूनच चढला आणी त्या आगाऊ म्हातारीचा राग माझ्यावर काढीत ती ओरडली -
"श्रीखंड खा नाहीतर धपाटा खा"
कदाचित शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकातल्या गान्धी-कौतुकाच्या अतिरेकामुळे मी पण छाती फ़ुगवीत ओरडलो -
"धपाटा खाईन पण श्रीखंड खाणार नाही!"
तेवढ्यात एक समजुतदार आजी माऊंटबॅटन च्या अविरभावाने मध्ये आली व म्हणाली
"आहो सबनीस बाई. शांत व्हा. हे बघ बाळ" मला उद्देशून ती म्हणाली "नसेल खायचे श्रीखंड तर नको खाऊस. पन बाकी सगळं तयार व्हायला दोन तास तरी लागतील. थांबशील तोपर्यंत?"
माझा सत्याग्रही बाणा साबूत राखित मी म्हणालो,
"दोन तास थांबेन पण श्रीखंड खाणार नाही!"
"ठीक आहे मग. रहा उपाशी दोन तास." माझी आजी म्हणाली. आणी खिदळणार्या म्हातार्यांबरोबर स्वयंपाकाकडे चालती झाली.
दोन तासांने मी आज्यांच्या पंक्तीत जेवलो. श्रीखंडाला हात देखील लावला नाही.
त्या घटनेनन्तर आजसुद्धा त्यातली कोणतीही आजी रस्त्यात भेटली तर विचारते,
"काय रे? अजूनही श्रीखंड खात नाहीस का?"
आणी मी ओशाळत म्हणतो "नाही".

29 Comments:
ha blog pan chan ch lihila aahes, lihit ja marathit pan..
Arre shrikhanda na avadnarya chitapapi manushya, tula hya agau vartanukibaddal gharya-gorya 'khanda'peethane dar ekadshi la bhajnimandalachya baithakina haazir rahanyachi ani tyaveli 2 wati amrakhanda ani 3 pele amba lassi gatagat pinyachi shiksha sunavli pahije.
Tya Penn State chya Maharashtra Mandalane tujhya tondala amrakhanda faasoon gadhvavarun dhinda kadhli pahije tujhi.
Thaamb tu, ek slighted Shrikhanda premi kay karu shakto hyachi tula kalpana nahi ahe. Atta lagech orkut var 'I hate Shrikhanda' chi community ughadto ani tuhya hya blog chi link tikde post karto. Mug Samna chya vachkanchya patravyavaharat ek jahaal patra lihito complaining about your khekdyasarkhi attitude ani lack of reverence for Marathi values.
Tya annoying orkut sobat nahi hey post delete karayla laavle tar navacha Punekar nahi.
naavacha punekar mhanavtos tar aadhi Sakal madhye patra lihile pahijes. :P
Arre Punekar me navacha ahe. Gavacha Mumbaikarach ahe. Anyways. Nice post! Especially that bit about, 'Arrey hey shrikhanda tujhya aajine nahi banavlele, kha pahun.' Hasun hasun purevaat zaali.
lol.. किस्सा आवडला. मलाही पुरणपोळी अजीबात आवडत नसल्याने असे घा-या गो-या आज्यांचे कुत्सित कमेन्ट्चे किस्से माझ्या बाबतीतही बरेचदा घडलेत ते आठवले:))).
गौरव खूप दिवसांनी तुला इथे पाहून छान वाटलं.
लिहित रहा मराठीत (म्हणजे अक्षर आणि शुद्धलेखन सुधारेल :)) :P[अशीच एक गो.घा.कु.कमेन्ट द्यायचा मोह आवरला नाही:))])
1. एखाद्या मुहर्रमच्या ताजियामध्ये अडकलेल्या शिवसैनिकासारखा त्रस्त दिसत होतो.
2.ह्या आज्यांच्या घोलक्यातून माझ्या जन्मदात्याची जन्मदात्री पुढे आली व तिच्या कणखर आवाजात म्हणाली
ROTFL
पण का हो तुम्ही मुंबईकर वाटतं? तुम्हाला श्रीखंड का आवडत नाही?
Baaki sarv theek aahe parantu swatahla Shrikhand kivva amrakhand aavdat nasle mhaNun USA madhlya AmraKhandachi aalochna karNe he mala kaahi awadle naahi ....
Mukhya maNje tumche he mhaNne ki mango lassi ek "bastardized abomination" aaHe agdich chook aahe ...
Too much!!!
mala swatala shrikhand khup avadate... nusate diwasbhar fakt shrikahndach khanyaitke...
Pan mala AAMBA avadat nasalyane asha comments mee fakt punekarankadun nahi tar baki sagalya jaga kadun aiklya ahet...
Baryachda amaras-puri ya jevanavli mee nusatya purya suddha khalya ahet...
doctorkaka, thanks for the praise. kasa vatatay san diego? malaa faar avadla hota.
chetan, to khochak remark fakta ek punekar aajeech maru shaktey.
tulip, puranpolichehi mala faar kautuk naahi. fakta maajhya aichiya haatchi changli astey... kaaran tee atee godgod naahi karat.
yogesh, khara saangu ka, malaa svatahalach kaLat nahi mee punekar ka mumbaikar.
nikhil, mhaNaNaar... mhaNaNaar mhaNaNaar!
shantanu... aamras puri.... brrrrrrrr..... that tastes even worse than shrikhand puri. you know what, i think i have philsophical, epistemological and ontological issues with having anything sweet with puri or chapati.
Laaj vatali pahije amrakhanda avadat nahi mhane! (shrikhanda badal mafi karan mala pan avadat nahi :)) tu pan ghara-gora na? tari suddha!! lahanmulana cahacha hatta kela ki dudhat ek chamcha cahatakun ranga badul detat tasa tula gandavala pahije, mug baghu kasa amrakhanda khat nahi!! avadat nahi mhanje kay!
श्रीखंडा वरुन आठवले, पियुष नावाचा प्रकार ऐकीवात आहे का? अशी अफवा ऐकली आहे की, डेअरी मध्ये रात्री उरलेल्या श्रीखंडाचे भांडे धुवुन त्याचे पियुष बनवितात, तेव्हापासून त्या प्रकराकडे बघायची देखील हिंमत होत नाही.
केतन
Hey Gaurav,
This is Hrishikesh Gadre. tuza blog adhun madhn vachto (marathi nahi, Vantage Point). politics pasun sahitya paryant ani natya sangeeta pasun rock music paryant tuza lihinyacha scope manla pahije..
ha amrakhanda varil kissa vishesh awadla mhanun comment lihayla ghetli, baki kahi nahi... good one, hasun hasun purevat zali.. "yeh PSPO nahin jante" i can imagine the look on those "aajjis" faces
keep writing
Tula jasa shrikhandachya babtit vaatata tasa majhya navryala "masala milk" chya babtit vaatata. Toh jevha majhya aai-vadilanna pahilyanda bhetayala ghari aala tevha majhya aai ne tyala ek glass bharun masala milk dilele. Pan tujhya saarkhe toh kahich karu shakla nahi aani mukatyaane sagla pyayala...tujha post vaachtana mala toh divas athavla aani pot bhar hasle..
Wish I could display similar guts and declare "Hapus Ambe are rather over-rated". But as long as I'm in Pune, I don't dare to voice such beliefs!
Gaurav tuze "Shrikhand Bharat" aikoon jabri maja ali....mitra asech post karat raha!!!!!!
:D :d :d khup diwasanantar marathi wachal ..majedar prasang aahe :))
Mast lihilay.. :)
Lihit raha..
खुप छान ब्लोग आहे
mala marathi font lihayacha kasa hey knu saangel ka?
majhya feelings bicharya bapudwanya houni ya agamya font madhe bhatkanti karata aahet. help me pls.....................
dhamal lihilay...... dh ma l. maja ali...
Apratim... Almost fell off my sofa rolling with laughter. Too good! Specially the Aaji's Comment!
Hi Gaurav, Sahi lihitos. Marathis blog karata yete he baghun maja watali. me pan marathi blog karayala basalo, tar . (full stop) dilyavar tyacha | banatoy (bcos its hindi right?). sadha . (purna viram) kasa dyayacha te saangshil ka pls.
Atyanth Chan God Gondus Blog aahey tumcha
mesothelioma attorney
Hi,
I have landed here by accident. I am a Kanndiga brought up in Mumbai, and I've read lots of Marathi Novels, and still read. I was searching for Shri. Jayvant Dalvi's novels online, and landed on your blog. I must say that Marathi Literature is just superb,and works of many authors was far ahead of the time...and I agree that people take pride in mentioning all well-known English authors but they haven't read their religional literature, and those who haven't read, do not know that they are missing out on essence of their being.
Your blog here is nice, and the incident you've mentioned is something I can very well relate to. Even though I was not fussy eater, still there are somethings I do not eat no matter how hungry I am..I remember picking up every tiny mustard seed, onion and jeera from anything that was given to me as a kid. I have got nice scoldings by my mom for that.Now, I have improved, and usually eat whatever comes my way without much fuss..anyway, once one is married,and has to cook at home, will know better than to make a fuss! LOL
वाचून खुपच छान वाटल.ज्या निर्दोष भाव नि हे वर्णन
झाले आहे त्यानी आनंद द्विगुणित होतो.लिहत रहा अशीच छान छान ब्लॉग कथा.
Hey Gaurav! Where did you get your marathi font from? Is it transilterated, as in if i typed Gaurav, would it come out as Gaurav? Im actually looking for a good Hindi font, but having very bad luck finding them!
oops, that was Chandani, aka Aranyi.
छान लिहितोस गौरव,
मी Arindam Chaudhuri बद्दल शोध घेताना तुझा शोध लागला आणि मग हा मराठी ब्लॉग.
मी काय म्हणतो, श्रीखंड खाणे हे काही पाप नाही.
Try कर आनंद घेण्याचा - आता तरी.
2 तास extra उपाशी राहिलास, वेड्या हट्टाने ?
हं, तेव्हा तुला emotional blackmail नावाचा प्रकार माहीत नसेल.
आत्ता इच्छा होत असेल तर गुपचुप हॉटेल मध्ये जाऊन खाऊन ये. घरी सांगूच नकोस आणि मग ताठ मान करून सांग - "नाही खात"
Birthastro provides you to calculate kundli matching which is also known as horoscope matching and is used in vedic astrology to check the compatibility between two individuals.click here for online kundali matching at Birthastro, this is a dedicated software of online Kundli or online horoscope
Post a Comment
<< Home